सावंतवाडी : ब्लु स्टार स्पोर्ट्स क्लब सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडी शहरात प्रथमच ( SC प्रवर्गातील खेळाडूसाठी) 17,18 आणि 19 मार्च या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक भव्य खुल्या एक गाव एक संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सिंधुदुर्ग सह गोव्यातील संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेत केवळ मागासवर्गीय (sc) समाजातील खेळाडूंना प्रवेश असणार असून, एका गावच्या एकाच संघास प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ११ हजार रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक , मालिकावीर अशी इतर पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेची प्रवेश फी 2 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघानाच प्रवेश देण्यात येणार असून, १२ मार्च पर्यंत गुगल पे द्वारे 7798492934 प्रशांत पाटणकर या नंबर वर १ हजार रुपये फी भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सावंतवाडी येथील जिमखाना मैदान, स्वार हॉस्पिटल समोरील मैदानावर होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अमन अनावकर 9021401898, अमर जाधव 9545712500, निखिल कांबळे 9529976681 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ब्लु स्टार स्पोर्ट्स क्लब कडून करण्यात आले आहे.





