दलित वस्ती सुधार योजनेतला कोट्यावधींचा निधी परत जाणार…?

सावंतवाडी : जि. प. च्या समाज कल्याण विभागाला दरवर्षी दलित वस्ती सुधार योजनेतून कोट्यावधी निधी प्राप्त होत आहे. आपण समाजकल्याण सभापती म्हणून यासाठी खूप मोठा संघर्ष केला, त्यामुळे निधित वाढ करून मिळत आहे. परंतु हा निधी परत जाणार असल्याचे वृत्त आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. याला पूर्ण पणे जि. प. प्रशासन जबाबदार असून, निधी मार्च अखेर पर्यत खर्च न करता शासनाकडे परत गेल्यास जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करू अशी संतप्त प्रतिक्रिया माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली आहे.

जि. प. समाजकल्याण विभाग यांना दरवर्षी अनुसूचित जाती, बौद्ध धर्माचा विकास या योजनेतून पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना यातून कोट्यावधी निधी निकास कामे करण्यासाठी मिळत असतो. मात्र, यावर्षी हा निधी परत जाणार असल्याचे समजत असल्याचे सांगत, अंकुश जाधव यांनी संताप व्यक्त करणारी तीव्र प्रतिक्रिया दिली.