मळेवाड श्री देव नाईक वस देवतेचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी : उद्या 7 जानेवारी रोजी मळेवाड नाईकवाडी (जकातनाका) येथील श्री देव नाईक वस देवतेचा वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम, पूजा , अभिषेक आणि यानंतर भाविकांना दर्शन, नवस फेडणे व रात्री वालावलकर दशावताल नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग असे आयोजन केलेले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.