विलवडे गावातील स्टोन क्रशर ठरतायत डोकेदुखी | तहसिलदार अरुण उंडे यांच्याकडे मांडल्या व्यथा

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील कृषीप्रधान विलवडे गावात काळ दगड खाणीत सुरुंग स्फोटामुळे घरांना भेगा, वाफोली हद्दीत दगडापासून वाळू बनविणे, खडी क्रशरच्या धुळीमुळे बागायती नुकसान, प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विलवडे नुकसानग्रस्त व पिडीतांनी माजी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे व माजी विलवडे शाखा प्रमुख संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांच्या आपल्या व्यथा मांडल्या.

यासाठी दगड खाणी व त्यावर प्रक्रीया करणारे (क्रशर) आदी प्रकल्प त्वरीत बंद करण्यासाठी आपली भुमिका व व्यथा मांडली.

विलवडे व वाफोली हद्दीत काळ्या दगडापासून खडी व वाळू बनविण्याचे प्रकल्पासून १०० मीटरवर गावची वस्ती आहे. रात्र दिवस या प्रकल्पासून सतत कर्कश आवाज यातून उडणारी धुळ व काळा दगड उत्खननासाठी शक्तीशाली स्फोटासाठी वापरलेले रासायनिक पदार्थाची दुर्गंधीमुळे गावातील नागरीकांना श्वसनाचे व इतर आजार होत आहे.

यासाठी दगड खाणी व त्यावर प्रक्रीया करणारे (क्रशर) आदी प्रकल्प त्वरीत बंद करण्यासाठी आपली भुमिका व व्यथा मांडली. यावेळी तहसीलदार अरुण उंडे यांनी सांगितले की काळ्या दगडाच्या खाणी किंवा क्रशरला परवानगी ही जिल्हा खणीकर्म विभाग यांनी परवानगी दिलेले आहे. त्यामुळे क्रोरी व क्रशरमुळे होणार त्रास त्या संदर्भात तुम्ही जिल्हा खणीकर्म विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा. माझ्याने कारवाई करता येईल ती करतो असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. यावेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून तहसीलदार व नाय तहसीलदार यांना धाब्यावर धरले.

यावेळी नायब तहसिलदार मनोज मुसळे, विलवडे नुकसान ग्रस्त पिडीत सुजिता सावंत, संदिप सावंत, संदेश सावंत, रश्मी सावंत, संपदा सावंत, दिपीका सावंत, समिता सावंत, समिर सावंत, नीता सावंत, अजित दळवी, किर्ती दळवी, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.