बांदा : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल भेडशी तालुका दोडामार्ग येथे नागेश सावंत यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. तीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर नवभारत विद्यालय परेल मुंबई आणि शेवटच्या टप्प्यात न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या प्रशालेतून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी आता वयोमानानुसार निवृत्त होत आहेत.
दानशूर आणि सर्व कामाची आवड असलेले व्यक्तिमत्व, निरंतर शिक्षण घेण्याची आवड, सतत वाचन ही त्यांची ओळख. नोकरी करत असताना वयाच्या पन्नासाव्या वर्षी एम ए व ग्रंथ शास्त्रातील बी.लीब. ही पदवी संपादन केली. पुढे देखील वकिली परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्यांचा मानस आहे. नागेश सावंत यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.





