मोती तलावाच्या कठड्याच्या कामासाठी सुरु असलेले उत्खनन बेकायदेशीर : अजित सांगेलकर, तहसीलदार यांच्याकडे अर्ज देऊन तक्रार

147

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावाच्या कठड्याचे तीन मुशी शेजारी काम चालू असून सदर कामाच्या ठिकाणी जे मातीचे उत्खनन जेसीबीच्या सहाय्याने सुरू आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर असल्याबाबतची तक्रार ठाकरे गट ग्राहक मंच संरक्षण कक्ष शहर प्रमुख अजित सांगेलकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे अर्ज करून केली आहे.

तसेच डंपर ने मातीची जी वाहतूक सुरू आहे त्या संदर्भात रॉयल्टी भरलेली आहे का ? असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला असून सदर माती उत्खननची रॉयल्टी भरलेली नसल्यास होणारी मातीची वाहतूक बंद करण्याचे आदेश द्यावेत असेही अर्जात नमूद केले आहे. सदरच्या उत्खननाची पाहणी करुन चौकशी करून योग्य तो निर्णय न घेतल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशाराही अजित सांगेलकर यांनी दिलेल्या निवेदनातून तहसीलदार सावंतवाडी यांना दिला आहे.