चोरट्यांचा मोर्चा गावात | सावंतवाडी नजीकच्या गावातल बंद घर फोडलं

सावंतवाडी : मळेवाड माळकर टेंब येथील एका मुंबई स्थित व्यक्तीचे बंद घर काल रात्री सुमारे १२.३० च्या दरम्याने चोरट्यानी फोडल्याची घटना. सकाळी घर कामासाठी असणारा मजूर आला असता घर फोडल्याची कल्पना त्यांनी फोनवरून मालकाला दिली.

यानंतर पोलिसांची संपर्क करून घटस्थाळी क्षेत्राचे पोलीस हवालदार व्ही व्ही केरकर, पोलीस नाईक प्रदीप नाईक हे घटनास्थळी येऊन घराची पाहणी केली असता बेडरूम, किचन हॉल मधील सामान विस्कटून टाकलेले दिसून आले. घराच्या आतील सीसीटीव्ही कनेक्शन तोडले असल्याचे दिसून येते. मात्र, तोडण्याअगोदर चोरटे त्यात कैद झालेले दिसून येतात.