सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायत अज्ञात चोरट्यांकडून फोडून सामानाची नासधुस केलेली आहे.
पेंडूर ग्रामपंचायत इमारत अज्ञातांकडून फोडून सामानाची व कागद पत्रांची नासधूस केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पेंडुर ग्रामपंचायत मधील पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामपंचायतचा हॉल फोडून त्यातील सामान व कागदपत्रे विस्कटून टाकलेली आहेत. पेंडूर सरपंच गीतांजली कांबळी यांनी प्रथमदर्शनी सामानाची नासधुस व कागदपत्र विस्कटलेले असून कोणतीही चोरी झाली नसल्याची माहिती दिली. गटात तळी वेंगुर्ला पोलीस हजर होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला.





