बेजबाबदारपणे एसटी हाकल्याने युवक – युवती किरकोळ जखमी

सावंतवाडी : सावंतवाडी शिरोडा रेडी गाडीच्या चालकाने काहीशी वेगात एसटी हाकल्याने मळेवाड येथील दोन कॉलेज युवक व एक युवती किरकोळ जखमी झाली आहेत. सावंतवाडी शिरोडा रेडी बस चालकाने गतिरोधकावर बेदरकारपणे हाकल्याने, एसटी वेगात असल्याने एसटी उडाली आणि या एसटीतून प्रवास करणारे मळेवाडीतील दोन कॉलेज युवक व एक युवती ही जखमी झाली आहेत.

याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आगार प्रमुख किंवा स्थानक प्रमुख कोणीही उपलब्ध नसल्याने नातेवाईकानी नाराजी व्यक्त केली. आगारात जो कर्मचारी होता त्याकडे त्यांनी आपली तोंडी तक्रार कथित केली आहे. बेदरकारपणे एसटी हाकणाऱ्या चालका विरोधात नातेवाईक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तसेच बेपर्वाईने एसटी चालवणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी नातेवाईकातून केली जात आहे.