निरवडे कोनापाल शाळेचा शंभू पांढरेची चमकदार कामगिरी…!

सावंतवाडी : निरवडे कोनापाल शाळा नंबर 2 चा शंभू गणपत पांढरे याने शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादित केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळा निरवडे कोनापाल नंबर 2 चा विद्यार्थी कु.शंभू गणपत पांढरे हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तिसरा व सावंतवाडी तालुका गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेला आहे.तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाही उत्तीर्ण होऊन नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरलेला आहे.

या यशाबद्दल निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे, ग्रा. प. सदस्य दशरथ मल्हार, ग्रा. प. सदस्य प्रगती शेटकर, ग्रा. प. सदस्य रेश्मा पांढरे, ग्रा. प. सदस्य आदेश जाधव, शा. व्य. समिती अध्यक्ष संदीप बाईत, सामाजिक कार्यकर्ते रमेश पांढरे, शिक्षणप्रेमी बाळा बाईत, मुख्याध्यापक दत्तकुमार फोंडेकर, नीलम कानसे, नारायण नाईक, उदेश नाईक, स्वप्नाली गरड आदी उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.