कुडाळ : पिंगुळी गुढीपुर येथील आई भद्रकालीचा जत्रोत्सव 07 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ठीक 10 वाजता सत्यनारायण महापूजेच आयोजन केले आहे. रात्री ठीक 8 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व ठीक रात्री 12 वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर कुडाळ यांचा कर्ण पिशाच्च हा नाट्य प्रयोग होणार. नाट्य रसिकांनी, दशावतार प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे.




