कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली शहरात तसेच तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमध्ये देखील माळरानांवर जुगार – मटका यासारखे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. मात्र कुठेतरी चाहूल लागली आणि संबंधित बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाल्या की पोलीस तात्पुरत्या ॲक्शन मोडवर दिसून येतात. मात्र हे अवैध धंदे सुरू असल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय उदाहरणासह समोर आलाय..!
कणकवली शहरात कलमठ येथे चक्क जुगाराच्या आर्थिक देवाण – घेवाणीतून रिक्षाच जाळली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले. मात्र, सर्वसामान्य जनतेतून हे असे अवैध धंदे बंद होणार कधी ? पोलीस याबाबत तातडीने कारवाई करतील काय ? अशा चर्चा कणकवली शहरात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस कणकवली तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





