कणकवली : माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षेला कणकवली तालुक्यातील ३२ दिव्यांग विद्यार्थी कणकवली कॉलेज, एस. एम. हायस्कूल, फोंडा हायस्कूल, कनेडी हायस्कूल ,खारेपाटण हायस्कूल, कासार्डे हायस्कूल या केंद्रातुन बसली आहेत. यामधून १८ मुलांना पेपर लिहण्यासाठी सहलेखनिस व वाढीव वेळ अशा सुविधा दिल्या.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी दिव्यांग मुलांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. महालिंगे, केंद्र संचालक श्री. चव्हाण. श्री. जाधव, श्री भिसे, भाऊसाहेब कापसे, नितेश तेली, कमलेश कामतेकर, सचिन सर्पे यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.





