सांगली : एकाच वेळी संशयस्पदरित्या पाच गवे रेडे मृत अवस्थेमध्ये सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या रिळे या ठिकाणी आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी एका गव्याचा मृत्यू झाला होता, त्यामुळे एकूण सहा गवे रेडे मृत्युमुखी पडले आहेत. वन विभागाकडून या गव्यांचे शविच्छेदन करून दहन करण्यात आले आहे. प्राथमिक तपासामध्ये विषबाधा होऊन गव्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.





