गौरवास्पद | यूट्यूबच्या CEO पदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती…!

यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. आता अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.

यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे. सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या २०१४ साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती झाली. पण, कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचा राजीनामा देत असल्याचा सुसान व्होजिकी यांनी सांगितलं.