सिंधूदुर्गनगरी : ओरोस बु. सावंतवाडा येथील श्री देवी भवानी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी 7 वाजता श्री देवी भवानी माता मूर्ती अभिषेक, 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 ते 3 आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी 6 ते 7 वाजता स्थानिकांचे भजन, 07:30 वाजता चेंदवणकर दशावतार नाटय़मंडळाचा `रक्तांग चित्रांग’ हा पौराणिक नाटय़प्रयोग सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन जय भवानी मित्रमंडळ, सावंतवाडा यांनी केले आहे.





