देवगड येथे पाकिस्तान विरुद्ध महिलांचे आंदोलन ; सिंदूर पंतप्रधानांना पाठवून केला निषेध
देवगड (प्रतिनिधी)
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत सरकारने १४ सप्टेंबर रोजी क्रिकेट सामना खेळण्याचा निर्णय घेतला. या घटनेला “आमच्या भगिनींच्या सिंदूराचा अपमान” अशी भूमिका घेत महिला कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन उभारले.
देवगड एसटी स्टँड समोर रविवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनानंतर प्रत्येक तालुक्यातील महिलांनी आपापला सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून सरकारला “हमारा सिंदूर – हमारा देश” या भावनेची जाणीव करून दिली.
या आंदोलनावेळी तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गांवकर, उपतालुका प्रमुख विष्णू (दादा) सावंत, वर्षा पवार, नगरसेवक तेजस मामघाडी, सुधीर तांबे, महिला उपतालुका प्रमुख प्रगती तेली, विभागप्रमुख मंगेश फाटक, श्रीकांत गांवकर, जामसंडे शहरप्रमुख रिया शेडगे, उपशहरप्रमुख गणेश कांबळी, प्रफुल्ल कणेरकर, शिवसैनिक उदय करंगुटकर, योगेश गोळम, गौरव सावंत, रामदास कोठारकर, माधुरी ठूकरुल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.