बांदा पोलीस चेकपोस्टवर साडे बारा लाखांची दारु पकडली | बांदा पोलीसांची मोठी कारवाई

बांदा : गोवा ते इंदौर दरम्यान होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांची दारु या कारवाईत पकडली आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर (एमएच ०४ जीआर ७२३८) असा एकूण २२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दारु वाहतूक प्रकरणी जुल्फिकार ताजअली चौधरी (५६, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई काल रात्री १२.२० च्या सुमारास बांदा पोलीस चेकपोस्टवर करण्यात आली.

या कारवाईत ७२२ पुठ्ठ्यांच्या बॉक्स मधील गोवा बनावातीची दारू पकडण्यात आली सदर कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, प्रथमेश पोवार व विजय जाधव यांच्या पथकाने केली. बर्‍याच महिन्यांच्या कालावधी नंतर चेकपोस्टवर मोठी दारु कारवाई करण्यात आली आहे.