पुणे : भाजपा नेते माधव भंडारी यांच्या पत्नीचं काल (3 जानेवारी) पुण्यामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा वेलणकर भंडारी या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी काल वयाच्या 60 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. आज पुण्यातील नवी पेठ परिसरामध्ये त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.



