देवगड : मिठबाव व्यापारी मित्रमंडळ मिठबाव यांच्या आठवा वर्धापन दिन सोमवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे . या वर्धापन दिनाचे औचित्य साधून व्यापारी मित्र मंडळ मिठबावच्या वतीने भव्य खुली नृत्य स्पर्धा २०२३ चे आयोजन सोमवारी रात्री ९:३० वाजता मिठबाव बाजारपेठ येथे करण्यात आले आहे.
या नृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ६६६६ व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक ५५५५ व सन्मान चिन्ह , तृतीय क्रमांक ४४४४ व सन्मानचिन्ह चतुर्थ क्रमांक ३३३३ व सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ २२२२ व उत्तेजनार्थ ११११ आदी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी या स्पर्धेसाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांनी आपली नावे विनोद (भाई) लोके ९४०३३६४१७७ व सौ अनया जेठे ९४२३९२०३५४ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन अध्यक्ष,सचिव व्यापारी मित्रमंडळ मिठबावच्या वतीने करण्यात आले आहे.




