सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बालसाहित्य संमेलन व बाल संसद आयोजित करण्यात आले आहे. मळेवाड शाळा क्रमांक १ येथून मळेवाड तिठा येथे ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय संस्कृती व महाराष्ट्राची परंपरा या ग्रंथ दिंडीत दाखवून साहित्य चळवळ पुढे नेण्याचा वारसा यातून मळेवाड शाळकरी मुलांनी घालून दिला आहे. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आधी जयघोषाने ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीला कोमसाप अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, तालुका सचिव प्रतिभा चव्हाण, लेखिका उषा परब, सुभाष गोवेकर, प्रज्ञा मातोंडकर, दीपक पटेकर, मंगल नाईक, ऋतुजा सावंत भोसले, केंद्रप्रमुख देसाई, उपसरपंच हेमंत मराठे, सदस्य महेश शिरसाट, सानिका शेवडे, मधुकर जाधव, सातारकर, मंजिरी मांजरेकर, गुरुनाथ मुळीक, चंद्रकांत मुळीक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर विजय मुळीक शाळा क्रमांक च्या मुख्याध्यापिका मंजुषा मांजरेकर दीक्षा आडारकर गीता धरणे जयश्री हरमलकर कविता शे ग डे प्रियांका पार्सेकर प्रवीण नाईक आधी उपस्थित होते.
मळेवाड तीठा येते या ग्रंथ दिंडीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर बाल साहित्य संमेलन व बाल संसद शाळा क्रमांक दोन येते होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती दूर्वा साळगावकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, आदींच्या उपस्थित होणार आहे.





