शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर फाटक यांचे  जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन 

60
देवगड / प्रतिनिधी

शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर फाटक यांचे  जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन 

शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर महादेव फाटक (55) यांचे २ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२० वा. च्या सुमारास जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर फाटक हे गेली तीन वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेची खबर महेश महादेव फाटक (५७) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.