४० वर्षांनंतर मुंबई टू विजयदुर्ग अशी रोरो बोट सेवा विजयदुर्गात दाखल ; ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत
गेले काही दिवस प्रतीक्षेत असणारी मुंबई टू विजयदुर्ग रोरो सेवा बोट आज विजयदुर्ग बंदरात सायंकाळी सहा वाजता दाखल झाली. यावेळी या बोटीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात विजयदुर्ग ग्रामस्थ व मुंबई चाकरमानी यांनी ही बोट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गातील महत्त्वाचे असलेले या बंदरात ही बोट आज दाखल करून पहिली यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे लवकरच ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे बंदर विकास मंत्री सिंधुदुर्गाचे पालकमंत्री माननीय आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.जर ही चाचणी व हवामान सुरळीत झाले तर परतीच्या प्रवासात चाकरमान्यांना या बोटीने मुंबईकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा आहे. विजयदुर्ग येथे बंदर जेटीचे काम पूर्ण झालेले असून आज या जेटीच्या पहिलीच बोट लागून चाचणी घेण्यात येणार आहे. विजयदुर्ग बंदरात आज ही बोट मुक्काम करणार आहे .