विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड शहरांमध्ये शुभारंभ

22

 

देवगड (प्रतिनिधी)

विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड शहरांमध्ये शुभारंभ

देवगड शहरातील विद्युत पुरवठा लाईन भूमिगत करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
जवळ आलेला गणेश चतुर्थीचा सण पाहता जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशी स्पष्ट सूचना यावेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी दिली. काम करताना मोबाईल व दूरसंचार यंत्रणा तसेच पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होणार नाही याबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आला.
देवगड एसटी स्टँड समोर भूमिगत विद्युत वाहिन्या करण्याचा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, देवगड तहसीलदार आर.जे पवार जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ बंड्या नारकर जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळ खडपे, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर , दया पाटील, प्रियांका साळस्कर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत , शरद ठुकरुल नगरसेवक बुवा तारी, सौ तन्वी चांदोस्कर, संतोष तारी, रोहन खेडेकर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर, शहर अभियंता छाया परब इत्यादी उपस्थित होते.