माजी आमदार कै. डॉ. य. बा.दळवी यांना कळसुली गावच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन

71

 

 

कणकवली ( प्रतिनिधी)

माजी आमदार कै. डॉ. य. बा.दळवी यांना कळसुली गावच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीच्या सभागृहात शोकसभा 

कळसुलीचे श्रद्धास्थान कै. डॉ. य. बा.दळवी (माजी आमदार) यांचे रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी देहावसान झाले आहे.

कै.डॉ.य.बा.दळवी यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची अखेर पर्यंत वैद्यकीय सेवा केलेली आहे.तरी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवार द 23 ऑगस्ट रोजी कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीच्या सभागृहात सकाळी 10.00 वाजता कळसुली शिक्षण संघ मुंबई व कळसुली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभा आयोजित केली आहे.तरी कै. डॉ. य. बा.दळवी यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी,हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन कळसुली शिक्षण संघ मुंबई व कळसुली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.