तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निलेश सोरप यांची फेर निवड
तळेरे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून निलेश सोरप यांची फेर निवड झाली आहे. नुकतीच ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी तंटामुक्त गाव समितीची पूर्ण रचना करण्यात आली. या सभेस सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण, ग्रामविकास अधिकारी राजलक्ष्मी जाधव, माजी उपसरपंच तथा सदस्य शैलेश सुर्वे, शशांक तळेकर, दिनेश मुद्रस,सामजिक कार्यकर्ते राजेश जाधव,यासह पोलिस पाटिल चंद्रकांत चव्हाण,सर्व ग्रा.सदस्य यासह ग्रामस्थ, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामसभेत विविध विषय विचारविनिमय करण्यात आला. तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य निवड करण्यात आली. सर्व उपस्थितांनी निवडीबद्दल निलेश सोरप यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.