देवगड तालुक्यातील स्वच्छतेमध्ये व पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी यांचा सन्मान
पंचायत समिती देवगड येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला .यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी ध्वजारोहण केले . याप्रसंगी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले . त्यानंतर देशभक्ती पर गिते विषय तज्ञ नारायण चव्हाण , विशेष शिक्षक दत्तात्रय घाडी , श्रेया अनभवणे यांनी सादर केली. त्यानंतर तनिष्क पेडणेकर या बालकाने देशभक्तीपर संवाद साधत सर्वांना मंत्रमुग्ध केले . त्यानंतर देवगड तालुक्यातील स्वच्छतेमध्ये व पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी त्यामध्ये शिरगांव येथील भाग्यश्री जाधव , पडेल गावातील अनंत मासये ,वाघोटन गावातील विष्णु घाडीगांवकर, तिर्लोट गावातील शैलेश गिरकर , मिठमुंबरी गावातील हेमंत तोडणकर, बांधकाम विभाग शरद चुनेकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे , विस्तार अधिकारी ग्रा.प दिपक तेंडुलकर , बांधकाम उप अभियंता नरेंद्र महाले , शाखा अभियंता बांधकाम अनिल तांबे , पशुधन अधिकारी डॉ . माधव घोगरे , सहाय्यक लेखाधिकारी विवेक चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले .