देवगड- प्रतिनिधी
इंद्रधनू देवगड संस्थेतर्फे १६ ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्सव
इंद्रधनू देवगड (रजि.) या संस्थेच्यावतीने व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. देवगड शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स येथे ‘दहिहंडी उत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या दहिहंडी उत्सवातील विजेत्या गोविंदा पथकास रोख ११ हजार १११ रू. चे बक्षीस देण्यात येणार आहे. या सोहळ्यात सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास आकर्षक बक्षीसेही देण्यात येणार आहेत.
इंद्रधनू देवगड या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख ५०० रू., सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख १ हजार रू., सात थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख २ हजार रू. चे बक्षीस देण्यात येणार आहे. तर विजेत्या गोविंदा पथकास रोख ११ हजार १११ रू. चे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी यतीन कुलकर्णी (९४२३३०३७८९) व उदय रुमडे (७०५७७५०७९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इंद्रधनू संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.





