श्रावण सोमवार निमित्त देवगड आगारातून सुटणार कोंडामा ,मार्लेश्वर ,गणपतीपुळे, अशी विशेष एसटी फेरी ; श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचा असणार यात समावेश

141

 

देवगड (प्रतिनिधी)

श्रावण सोमवार निमित्त देवगड आगारातून सुटणार कोंडामा ,मार्लेश्वर ,गणपतीपुळे, अशी विशेष एसटी फेरी ; श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचा असणार यात समावेश

पवित्र श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, देवगड आगार तर्फे यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या यात्रेमध्ये श्रीक्षेत्र मार्लेश्वर, श्री क्षेत्र गणपतीपुळे, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड, बाळूमामा कोंडामा अशा प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश असून, प्रवाशांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बससेवेचा मार्ग :
देवगड – जामसंडे – तळेबाजार – शिरगाव – नांदगाव – श्रीक्षेत्र मार्लेश्वर – श्रीक्षेत्र गणपतीपुळे – नांदगाव मार्गे – देवगड
प्रवासाच्या तारखा :
▪️ ११ ऑगस्ट २०२५
▪️ १६ ऑगस्ट २०२५
▪️ २८ ऑगस्ट २०२५
प्रवास भाडे :
▪️ पूर्ण तिकीटधारक – ₹५७५/-
▪️ ६ ते १२ वर्षांखालील मुले व महिलांसाठी (अर्धे तिकीट) – ₹३७८/-
▪️ ६५ ते ७५ वर्षे दरम्यानच्या नागरिकांसाठी (अर्धे तिकीट) – ₹३७८/-
▪️ ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत, फक्त ₹५/- बुकिंग शुल्क
▪️ २/४ नागरिकांसाठी – ₹१०४९/-
अटी व शर्ती :
१. आगाऊ बुकिंग ७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू आहे.
२. पूर्ण २४ सीट्स आरक्षित झाल्यावरच बस सोडण्यात येईल.
३. ग्रुप बुकिंगही स्वीकारण्यात येईल.
४. वाटेत जेवण व इतर खर्च प्रवास भाड्यात समाविष्ट नाही.

 

बस बुकिंगसाठी संपर्क :
▪️ श्री. विद्याधर चव्हाण (आगार व्यवस्थापक) – ८६०५४०५०४३
▪️ श्री. संदीप सैतवडेकर (सहाय्यक अधीक्षक) – ७८६७११३३३९
▪️ श्री. रामचंद्र गोरे (सहाय्यक वाहतूक नियंत्रक) – ९४२०७६७४६८
▪️ श्री. राजेश माने (वरिष्ठ सहायक) – ८२७५४३३५६९
▪️ श्री. अनिकेत कदम (कनिष्ठ सहायक) – ७८७५१४२२९२
▪️ श्री. गणेश भोसले (कनिष्ठ सहायक) – ९४२२७५०७३०
▪️ श्री. कुणाल लोखंडे (कनिष्ठ सहायक) – ८२७५०७३४५३
▪️ श्री. सचिन आंग्रे (ड्रायव्हर) – ८५५२८८०१६३