प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने रू.१,११,१११ ची दहीहंडी…

23

 

कणकवली (प्रतिनिधी)

प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने रू.१,११,१११ ची दहीहंडी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाणारी भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने कासार्डे येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोपाळकाल्यानिमित्त १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत कासार्डे तिठ्यावरील महामार्गालगतच्या पटांगणामध्ये हा उत्सव पार पडेल. या मंडळाचे हे १३ वे वर्ष असून, यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असेल. या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह प्रमोद जठार आणि दोन्ही जिल्ह्यांतील अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
आठ थर रचून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रोख रु. १ लाख ११ हजार १११ आणि ‘कोकण दूध चषक’ देण्यात येईल. या व्यतिरिक्त, चार थरांची सलामी देणाऱ्या पथकांना रु. ३,३३३, पाच थरांसाठी रु. ४,४४४, सहा घरांसाठी रु. ५,५५५ आणि सात थरांसाठी रु. ६,६६६ रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल, दुपारी २.३० वाजता स्थानिक मानकरी व कार्यकत्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडीचा शुभारंभ होईल.
सायंकाळी ४ वाजल्यापासून रसिक प्रेक्षकांसाठी कोल्हापूर येथील उमर मुल्ला प्रस्तुत ‘ऑर्केस्ट्रा तुफान मेलडीज’ हा हिंदी-मराठी रिमिक्स, लावणी आणि नृत्यगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाईल. यामध्ये आधुनिक साऊंड सिस्टिम, लेझर लाईट इफेक्ट्स आणि आकर्षक भेटवस्तूंसह लकी डॉ कुपनचेही आयोजन करण्यात आले आहे. मा दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव (९४०३२८९००५) किंवा भाजप कार्यालय, कासार्डे येथील रोहित महाडीक (७०६६९३१०५३) यांच्याशी संपर्क साधावा.