बांदा डिगणे बांबरवाडी कालव्यावरील पुलाची संरक्षक भिंत वाढवा, साईप्रसाद काणेकर यांची मागणी

13

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

बांदा डिगणे बांबरवाडी कालव्यावरील पुलाची संरक्षक भिंत वाढवा, साईप्रसाद काणेकर यांची मागणी

पाटबंधारे अधिकाऱ्यांना निवेदन सादर

बांदा डिगणे बांबरवाडी रस्त्याच्या कालव्यावर असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीची उंची फारच कमी असून हि उंची वाढविण्यात यावी अशी मागणी कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चराटे, सावंतवाडी यांच्याकडे बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी आज गुरुवारी निवेदनाद्वारे केली.

या पुलावरून काही दिवसांपूर्वी एक सात वर्षीय मुलगा कालव्यामध्ये पडून अपघात झाला होता. तसाच अपघात भविष्यात सुद्धा घडू शकतो. सदर रस्ता हा रहदारीचा असून या पुलाजवळ वळण असल्याने भविष्यात एखादी गाडी कालव्यात कोसळून अपघात होऊ शकतो, अशी भीती श्री. काणेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्यावर 100 मीटर पर्यंत नागरीवस्ती असल्याने या ठिकाणी हि संरक्षण गार्डची गरज आहे. तसेच या रस्त्यावर खडीकरण करून मिळावे, याबाबत आपण प्रत्यक्ष पाहणे करून लवकरात लवकर गार्ड रेलिंग बसवण्याची व्यवस्था करावी. अन्यथा यापुढे अपघात घडल्यास त्याकरिता आपणाला जबाबदार ठरविले जाईल असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी श्री. काणेकर यांच्या सोबत श्री. ओमकार नाडकर्णी व भाऊ वाळके उपस्थित होते.