कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची नवी दालने खुली
मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र आणि कर्ले महाविद्यालयात सामजस्य करार
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र (सीडीओई) आणि देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांमध्ये २८ जुलै रोजी सावंतवाडी येथिल पंचम खेमराज महाविद्यालय येथे विविध अभ्यासक्रमांकरीता सामजस्यं करार पार पडला.
देवगड तालुक्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना या सामजस्य करारामुळे उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर मुंबई सारख्या शहारांकडे धाव न घेता त्यांच्या घराजवळच उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. मुंबई विद्यापिठाच्या सिडीओई केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व सर्टीफिकेट पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.
अभ्यासक्रमाची संपर्कसत्रे आणि पारिक्षादेखील याच ठिकाणी होणार आहेत.सद्या नियमित महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नविन शैक्षाणिक धोरणानुसार एकाचवेळी दोन पदवी प्राप्त करता येतात यासाठी एक पदवी ऑनलाईन असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याची गरज ओळखून विद्यापिठाच्या या विभागाच्यावतीने सर्व अभ्यासक्रम शिरगांव येथे उपलब्ध करून दिले आहेत. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविली जात आहे.
पदवी आणि पदव्यूतर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संकेत स्थळावरून करता येणार असून प्रवेश प्रक्रियेसंबधातील सर्व तपशिल आणि माहितीपुस्तिका विद्यापिठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे सीडीओई मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांचे पूर्णवेळ तज्ञ व अनुभवी प्राध्यापक संस्थेत उपलब्ध आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता येत नाही नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना सीडीओई मार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमामुळे शिक्षणाची दालने खुली करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.सीडीओईचे ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.
सिडीओईच्या विविध अभ्यासक्रमासांठी दुहेरी पदवी शिक्षणाच्या प्रोत्साहन आणि अभ्यासकेंद्राच्या स्थापनेसाठीची कार्यपद्धती व करार यासाठी सीडीओईच्या माध्यमातून हा सामंजस्य करार झाला यावेळी सीडीओईच्या वतीने संचालक प्राध्यापक शिवाजी सरगर, प्राध्यापक अनिल बनकर, प्राध्यापक मंदार भानूशे उपस्थित होते कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी सामजस्य यांनी करार स्विकारला.
विविध विषयामध्ये प्रवेश घेण्याची संधी





