शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त खांबाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना लाभ
“विद्यार्थ्यांना योग्य साधनांची आणि वेळेवर मिळालेल्या मदतीची साथ लाभली, तर ते कोणतेही शिखर गाठू शकतात. शिक्षणात आत्मविश्वास वाढवणाऱ्या अशा उपक्रमांची आज समाजाला गरज आहे,”असे प्रतिपादन मुंबई पोलिस दलातील निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त प्रभाकर लोके यांनी खांबाळे येथील शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात केले.
खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सामाजिक जाणीवेतून खांबाळे गावातील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यात अर्धा डझन वह्या,पेन, छत्री यासारखी आवश्यक साधने देण्यात आली. याच कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना डॉक्युमेंट फाईल, पेन, छत्री भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रभाकर लोके म्हणाले, “विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत शिकत राहावे. शिक्षणातून प्रगती साधून उच्च पदापर्यंत जावे आणि आपल्या शाळेचे आई-वडिलांचे नाव उज्वल करावे”कार्यक्रमासाठी गावातील पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी मंगेश लोके यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळते,” अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी व्यासपीठावर सरपंच प्राजक्ता कदम, उपजिल्हाप्र प्रमुख नंदू शिंदे, उपसरपंच मंगेश गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रियांका पवार, माजी सरपंच गौरी पवार, निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू, गुलजार काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माजी सरपंच विठोबा सुतार, सोसायटी माजी चेअरमन दीपक चव्हाण, सुनील पवार, मंगेश सुद, सुनील गुरव, बुधाजी गुरव, नारायण पवार, प्रमोद लोके, गणेश सदाशिव पवार, मंगेश कांबळे, सूर्यकांत सुतार, मिलिंद पवार, परेश साईल, श्रीकृष्ण पवार, राजेंद्र पवार, राजेश पवार,शांताराम पवार,राजेंद्र देसाई,संदेश नीग्रे आदी उपस्थित होते