दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्ष पदी भालचंद्र पाटील चेअरमन पदी संजय शेटे यांची निवड !
दक्षिण भारत जैन सभेच्या हारुगेरी येथील सर्वसाधारण सभेत भालचंद्र विरेंद्र पाटील.यांची अध्यक्ष म्हणून पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी उर्वरित पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यामध्ये रावसाहेब जिनगोंडा पाटील. केंद्रीय उपाध्यक्ष संजय शेटे चेअरमन अभिनंदन पाटील.. व्हा. चेअरमन अनिल बागणे.. मुख्यमहामंत्री बाळासाहेब पाटील, बेडकीहाळ.. खजिनदार.शशिकांत राजोबा.. संघटन मंत्री यांनी पदभार स्वीकारला. याच बरोबर अध्यक्ष व मान्यवर पदाधिकारी यांनी इतर सर्व शाखां कार्यकारिणी जाहीर केली.
कोंकण विभाग …उपाध्यक्ष – अजित आण्णा शिराळकर (रत्नागिरी),महामंत्री भरतेश पायगोंडा पाटील,(मुगाली गोवा ),महिला महामंत्री – डॉ सौ.केतकी स्वप्निल धने (साडवली -देवरुख), केंद्रीय समिती सदस्य,पदवीधर संघटना – मिलिंद दत्तात्रय मांगले (साडवली -देवरुख)समन्वय समिती – दयानंद यशवंत मांगले (देवगड -सिंधुदुर्ग), वीर सेवा दल – अमित अजित खोत व अशोक कुमार पाटील (चिपळूण),वीर महिला परिषद – सौ सुरेखा महावीर कुसनांळे (देवरुख ), वीर महिला मंडळ – सौ सारिका सचिन कोल्हापूरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.