रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेले पदार्थ व गावठी घरगुती पदार्थाच्या विक्री प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

93

 

देवगड (प्रतिनिधी)

 

रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेले पदार्थ व गावठी घरगुती पदार्थाच्या विक्री प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

 

देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूलमध्ये रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्य पदार्थ तसेच गावठी घरगुती खादय पदार्थांचे प्रदर्शन, विक्री व पाककला स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आलेली होती. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन देवगड एज्युकेशन बोर्ड, समन्वय समितीचे अध्यक्ष व स्थानीय समितीचे सचिव ॲड.अविनाश माणगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून युवा उदयोजक , माजी विद्यार्थी दिग्विजय कोळंबकर, मुख्याध्यापक प्रविण खडपकर पर्यवेक्षिका सौ. दहिबावकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी इयत्ता सातवी ते नववी मधील एकूण ८o विद्यार्थ्यांनी रानभाज्या आणि या रानभाज्यांपासून खाद्यपदार्थ बनवून या प्रदर्शनात सहभाग घेतलेला होता. रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्यपदार्थाचे २४ स्टॉल होते. यामध्ये सुरणाचे वडे , शेवग्याची भेळ, तोंडलीचे समोसे, केळफुलांची भजी, भरलेली कटली, अळूचे पॅटीज, अळूचे लॉलीपॉप, ओव्याची भजी, अळूवडी, कुर्डूचे पराठे, टाकळा वडी, सुरणाची फ्रँकी असे विविध राणभाज्यांपासून पदार्थ तयार करण्यात आले होते . गावठी बाजारात उकडीचे तांदुळ , खारावलेले आंबे , गावठी हळद , आवळे, कोकम, आगळ, तांदळाचे लाडू , बिटाचे लाडू असे विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते. या निमित्ताने पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेचे परीक्षण युवा उदयोजक व माजी विद्यार्थी दिग्विजय कोळंबकर यांनी केले. यावेळी स्थानीय समितीचे सदस्य विलास रुमडे यांनी प्रदर्शनाला भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले .उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांचे देखील कौतुक केले.

या रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्यपदार्थ स्पर्धेमधील विजेते पुढील प्रमाणे-: प्रथम क्रमांक- सानवी विनोद मालवणकर व मुस्कान इरफान शेख नववी क. पदार्थ- सुरणाची कापे,द्वितीय क्रमांक- अध्याय आदित्य शिंदे सातवी ब पदार्थ- केळफुलाची भजी, तृतीय क्रमांक- शिवानी अरविंद गुरव नववी अ. पदार्थ टाकळा वडी.रानभाज्या व गावठी पदार्थ विक्री स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- हार्दिक रामभाऊ तेली व हर्ष संतोष तेली ९ वी अ ,द्वितीय क्रमांक- दुर्वा मधुकर पराडकर – ७ ब ,तृतीय क्रमांक- पूर्वी रविंद्र कोयंडे ८ वी ड व ऋतिका शैलेंद्र कणेरकर ८ क .शाळेच्या या उपक्रमास पालक वर्गाचे देखील उत्तम सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

 

या उपक्रमाचे संस्था पदाधिकारी आणि पालक वर्गाने देखील कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील आफ्रीन पठाण, शामू जंगले, ज्ञानेश्वर कुंभरे, पूजा गोसावी, राजेंद्र कोयंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापक प्रविण खडपकर पर्यवेक्षिका निशा दहिबावकर यांचे प्रोत्साहन मिळाले,इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.