कणकवली ( प्रतिनिधी)
भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या स्थापना दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार एकवटले
भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या स्थापनादिनी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले. याच स्थापना दिनाचे औचित्य साधून कणकवली, वैभववाडी, देवगड उपविभागातील कामगार वर्ग एकत्र येऊन उपविभागाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. भारतीय मजदूर संघ ही देशात प्रथम क्रमांकावर असलेली एकमेव कामगार संघटना आहे. ज्या संघटनेला ६ हजार हुन अधिक संघटना संलग्नित आहेत तर ३ कोटींपेक्षा जास्त सभासद संख्या या संघटनेकडे आहे. अश्या या देशातील बलाढ्य संघटनेच्या स्थापना दिनी कणकवली, वैभववाडी, देवगड उपविभागातील कामगार वर्ग एकत्र येत साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हातील सर्वांत उंच झेंड्याचे अनावरण केले. उपविभागातील सभासद कामगार असलेल्या ४९ गावात झेंड्याचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर मेरा घर BMS घर या उपक्रमाअंतर्गत उपविभागातील शेकडो कामगार वर्गाने आपल्या घरावर मजदूर संघाचा झेंडा लावून स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. तद्नंतर ग्रामपंचायत वारगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या स्थापना दिनाचा दिल्ली येथील थेट लाइव्ह कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आला. या कार्यक्रमास शेकडो कमागर वर्ग उपस्थित होता. सदर कार्यक्रमास प्रदेश सचिव श्री. हरीजी चव्हाण, विभाग संघटक भगवान साटम, जिल्हाअध्यक्ष सत्यविजय जाधव, जिल्हा सचिव हेमांतकुमार परब, उपाध्यक्ष अशोक घाडी, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, तंटामुक्ती अध्यक्ष जाधव साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम हा उपविभागाचे अध्यक्ष अशोक जगताप, कोषाध्यक्ष संतोष पाष्टे, गाव प्रतिनिधी मधुकर कुलकर्णी, संजय धुमक, सचिव सचिन लवेकर, संघटक सुधीर भरडे यांच्या विशेष सहकार्याने व या संपूर्ण कार्यक्रम हा भारतीय मजदूर संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली पार पडला.





