मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नळयोजनेच्या पाईपलाईन दुरुस्तीचे भूमिपूजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन

19

 

देवगड (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नळयोजनेच्या पाईपलाईन दुरुस्तीचे भूमिपूजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळपाणी योजनेच्या पाईपलाईनच्या दुरुस्ती कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.

 

हा सोहळा मंगळवार, दिनांक 22 जुलै 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता वेळवाडी सडा, साठवण टाकीजवळ संपन्न होणार आहे.

 

या विशेष दिनाचे औचित्य साधून भाजपा देवगड मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 9.00 वाजता टिळक स्मारक, जामसंडे येथे सुरू होईल.

 

या कार्यक्रमासाठी देवगड तालुक्यातील शहरातील नागरिक, सेवाभावी संस्था, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवगड तालुका भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.