देवगड / प्रतिनिधी
मोर्वे येथे कांदळवनाची तोड करून जाळल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल
देवगड तालुक्यातील मोर्वे येथील गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या खाडीनजीक कांदळवनांची तोड करून ती जाळण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 एप्रिल 2025 ते 19 जून 2025 या कालावधीत घडली आहे.





