देवगड (प्रतिनिधी)
जामसंडेत उद्या १९ जुलै रोजी भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेची महत्वपूर्ण बैठक
भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेची महत्वपूर्ण बैठक १९ जुलै रोजी सकाळी १० वा. जामसंडे येथील श्री दिर्बादेवी- रामेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भजन क्षेत्रातील असणाऱ्या समस्या, तसेच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीमध्ये संस्थाध्यक्ष संतोष कानडे व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीमध्ये कलाकार मानधन, विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन अशा विविध प्रश्नांवर चर्चा करणे व त्यातून मार्ग काढणे.
तसेच प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येणार आहे. या बैठकीला देवगड तालुक्यातील सर्व संगीतभजनी, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, झांजवादक, कीर्तनकार व अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





