आदर्श संगीत विद्यालय कणकवलीचा गुरुवंदना कार्यक्रम 19 व 20 जुलै रोजी

21

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

 

आदर्श संगीत विद्यालय कणकवलीचा गुरुवंदना कार्यक्रम 19 व 20 जुलै रोजी

आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त 19 व 20 जुलै रोजी गुरुवंदना कार्यक्रम कणकवली आदर्श संगीत विद्यालय चौडेश्वरी मंदिर नजीक आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्रमुख पाहुणे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रमुख उपस्थिती माध्यमिक विद्यामंदिर कणकवलीचे मुख्याध्यापक डॉक्टर पी जे कांबळे, सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, डॉक्टर मीनल नागवेकर, डॉक्टर विनय शिरोडकर, श्री गजेंद्र कृपाळ, डॉक्टर विवेक रेवडेकर,डॉ मुक्तानंद गव्ंडळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
19 व 20 जुलै अशा दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रथम सत्र 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजता पखवाज वादक संदीप मेस्त्री यांचे पखवाज वादन होणार आहे द्वितीय सत्र रविवारी 20 जुलै रोजी सकाळी दहा वाजता तर तृतीय सत्र 20 जुलै रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे .
यावेळी माजी संगीत शिक्षक विद्यामंदिर, संगीत गुरु बाळ नाडकर्णी सर जेष्ठ लोककला कलावंत हरिभाऊ भिसे ,पखवाज विशारद संदीप मेस्त्री गायन विशारद श्रुती परुळेकर, कथ्थक विशारद गौरी कामत यांचे यावेळी विशेष सत्कार केले जाणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आदर्श संगीत विद्यालय परिवार कणकवली यांच्याकडून करण्यात आले आहेत.