देवगड (प्रतिनिधी)
फाईन आर्टस स्पर्धेत देवगड महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीचे उल्लेखनीय यश
शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, यांच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने वतीने केले होते तालुकास्तरीय फाईन आर्टस स्पर्धेचे आयोजन
कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांच्या १११ व्या जयंती निमित्त मंगळवार दि. १५ जुलै २०२५ रोजी पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव यांच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने तालुकास्तरीय फाईन आर्टस स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.
सदर स्पर्धेत देवगड महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक- कु. सानिका विजय पुजारे (कनिष्ठ महाविद्यालय),
मेहंदी स्पर्धा-
प्रथम क्रमांक- कु. अनुष्का विनायक पवार (कनिष्ठ महाविद्यालय),द्वितीय क्रमांक- कु. प्राजक्ता रामदास हडपिडकर (कनिष्ठ महाविद्यालय),कु.रुद्रा रवींद्र शेटये (वरिष्ठ महाविद्यालय),तृतीय क्रमांक-कु. सलोनी संजय कदम (वरिष्ठ महाविद्यालय),उत्तेजनार्थ- कु. स्नेहा दत्तात्रय भस्मे (कनिष्ठ महाविद्यालय) यांनी यश संपादन केले.
शिक्षण विकास मंडळ संस्था पदाधिकारी व प्राचार्य प्रा.डॉ. विजयकुमार कुनूरे, उपप्राचार्य प्रा. डॉ.शरद शेटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन केलेल्या प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन केले.





