भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे स्वागत व अभिनंदन 

47

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे स्वागत व अभिनंदन 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे फळसेवाडी येथील सिंधुकन्या पोलीस खात्यात अप्पर पोलीस अधीक्षक ह्या पदावर काम करते हे सिंधुदुर्गातील समस्त महिला वर्गाला अभिमानाची गोष्ट आहे , असे उद्गगार सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी काढले .

 

यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण , जिल्हा पदाधिकारी मेघा गांगण , जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष सावी लोके , वैभववाडी मंडल अध्यक्ष प्राची तावडे , कणकवलीच्या हर्षदा वाळके , कुडाळच्या आरती पाटील , ओसरच्या सुप्रिया वालावलकर , वेंगुर्लेच्या सुजाता पडवळ , सावंतवाडीच्या मोहिनी मडगावकर , कुडाळच्या साधना माडिये इत्यादी उपस्थित होत्या .