तात्काळ शाळा दुरुस्त करून मिळावी, आचिर्णे ग्रामस्थांची गटविकास अधिकारी कार्यालयात धाव

21

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

तात्काळ शाळा दुरुस्त करून मिळावी, आचिर्णे ग्रामस्थांची गटविकास अधिकारी कार्यालयात धाव

आचिर्णे कडूवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करून द्या व तात्काळ शाळा दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी आचिर्णे कडूवाडी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेत ठिया आंदोलन केले. अखेर गटशिक्षणाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतली. विद्यामंदिर आचिर्णे कडूवाडी शाळा मोडकळीच आली असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यात धोका आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेच्या बाजूच्या घरामध्ये बसून शिक्षण घेत आहेत.

गेली अनेक महिने शासनाकडे शाळा दुरुस्ती करून मिळावी यासाठी मागणी करून अद्याप या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, सोमवारी सकाळी आचिर्णे कडूवाडी ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके व माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धाव घेत ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा द्या व तात्काळ शाळा दुरुस्ती करून मिळावी. या मागणीसाठी ग्रामस्थांनी अखेर आज आंदोलन केले. गटशिक्षणाधिकारी वडाम यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.