तळेरे येथे पायी वारीचे हरी नामाच्या गजरात स्वागत…

12

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

 

तळेरे येथे पायी वारीचे हरी नामाच्या गजरात स्वागत…

 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” या संस्थेच्या नियोजनतुन तसेच संस्था अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील 100 भजनी कलावंतांसोबत पायी वारीचा महासोहळ्याचे आले होते. या पायी वारीचे तळेरे येथे हरी नामाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

या पायी वारीतील सर्व भजनी कलाकारांच्या स्वागतासाठी सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती मनोज रावराणे,भजनी कलाकार संस्था अध्यक्ष संतोष कानडे,शशांक तळेकर,विश्वजीत तळेकर, प्रकाश घाडी,तसेच गावातील भजनी कलाकार व ग्रामस्थ उपस्थित होते. जेष्ठ भजनी कलाकारांच्या हस्ते श्रीफळ फोडून वारी हरी नामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.