भुईबावडा घाटात दरड कोसळली ; बांधकाम विभागाने तात्काळ बाजूला परत केला महामार्ग पूर्वरत सुरू
भुईबावडा घाटात दरड कोसल्यामुळे सोमवारी सकाळी काही वेळ वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र माहिती समजताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसिबीच्या साहायने दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरु केली आहे.
पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सह्याद्री पट्ट्यात रविवारी रात्री जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून दोन की. मी. अंतरावर दरडीचा काही भाग कोसळून रस्त्यावर पडला. त्यामुळे काही वेळ वाहतूकीला अडथळा झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसिबीच्या साहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.