गाव विकासात ग्रामविकास अधिकारी कदम यांचे मोलाचे सहकार्य -सरपंच जेराॅन फर्नांडिस

10

 

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

गाव विकासात ग्रामविकास अधिकारी कदम यांचे मोलाचे सहकार्य -सरपंच जेराॅन फर्नांडिस

गावविकासात विविध योजना राबविताना ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचे योगदान मोलाचे होते.असे मत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी आचरा ग्रामपंचायत येथे व्यक्त केले.

आचरा ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी कदम यांची बदली झाल्या निमित्त आचरा ग्रामपंचायत,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या तर्फे आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,पंकज आचरेकर, चंदू कदम,गावकर,शृती सावंत, हर्षला पुजारे, सारंग,पूर्वा तारी,माजी उपसरपंच पाडूरंग वायंगणकर, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत,उदय बापर्डेकर ,अजित घाडी, नमिता आचरेकर तसेच अन्य आशा स्वयंसेवीका ,ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब तसेच अन्य कर्मचारी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी आचरा ग्रामपंचायत तर्फे कॅन्सर ग्रस्त महिला शरयू हनुमंत तारी यांना ग्रामपंचायत आचरे तर्फे सरपंच फर्नांडिस यांच्या हस्ते रोख पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.