वैभववाडी (प्रतिनिधी)
वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी
वैभववाडी तालुक्यात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. शुक्रवारी अनेक ठिकाणी लग्न सोहळे होते.
या पावसामुळे व्यत्यय आला तर अंतिम टप्प्यात आलेल्या आंबा काजू पिकाला ही फटका बसला आहे. तालुक्यात गेली काही दिवस उष्णतेत कमालीची वाढ झाली होती मात्र गेले दोन दिवस काहीशी ढगाळ वातावरण होते. दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोपून काढले. तालुक्यातील वैभववाडी शहर, नावळे, सडूरे, अरुळे, कुसूर, उंबर्डे, भुईबावडा आदी सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या.





