मुंबई (प्रतिनिधी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे मुंबईत निधन; शांताबाईंनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लाडकी लेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या व संपूर्ण आयुष्यभर कम्यूनिष्ठ पक्षासाठी सेवाव्रती जीवन जगलेल्या काँ. शांताबाई साठे- दोडके (वय-९०) यांचे मुंबईतील कांदवली येथील सेव्हन स्टार रूग्णालयात रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर बोरीवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत सायंकाळी ७.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.





