राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा व राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा निकाल १०० %

37

 

देवगड दि.२४ (प्रतिनिधी)

राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा व राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा निकाल १०० %

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा व राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा निकाल १०० % लागला असून राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत ७ विद्यार्थ्यानी व राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत २ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे .
राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत कुमारी.अर्चना राजू तांबे, कुमारी .ईश्वरी अनिल घाडी, कुमारी.ईश्वरी प्रसाद शिवगण , कुमार.ओम गुरुप्रसाद अदम ,कुमार .मयांक प्रकाश कदम ,कुमारी.कीर्ती रामचंद्र भिडे , कुमारी.कार्तिकी संतोष ढोके यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे तर राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत कुमारी.लिशा उमेश आंबेरकर , व कुमारी .समृद्धी सुनील गुरव यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विषयाच्या शिक्षिका श्रीम.संजीवनी जाधव व सौ.समीरा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष ॲड.अजित गोगटे, सचिव -प्रवीण जोग , शाळा समिती अध्यक्ष-प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.