ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती, देवगड शाखेच्या मेळावा संपन्न
देवगड तालुक्यातील व परिसरातील ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आधारस्तंभ असलेल्या ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या चळवळीचा सुकाणू आपल्या खांद्यावर घेणारे जबाबदार कार्यकर्त्यांचा सहविचार मेळावा ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांचे प्रमुख उपस्थितीत मंगळवार (२२एप्रिल२०२५) सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा देवगड, येथे संपन्न झाला.
गुरुनाथ लोम्बर यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करून मेळाव्याच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले.ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊतसाहेब यांचे सक्षम व कुशल नेतृत्वाखाली ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आज तागायत करीत असलेल्या आंदोलनाची व पुढील करावयाच्या संघर्षाची माहिती ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांनी सविस्तरपणे मांडली. समितीच्या उगमापासून समिती करीत असलेल्या संघर्षाच्या वाटचालीची यशोगाथा कथन करून संगठन बळकटीकरण, विस्तारीकरण व ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या जागृतीकरण करणेबाबतच्या मार्गाचे सविस्तर स्पष्टीकरण अजितकुमार घाडगेंनी केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे समर्पक शब्दात आंदोलनाचे वर्णन करून समाधानकारक विश्लेषण करुन आंदोलनात सक्रिय सहभागी होणेस आवाहन केले. त्यास उपस्थितांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देवून पाठिंबा देऊन आंदोलनात सक्रिय सहभागी होणेचे आश्वासित केले. मेळाव्याला गुरुनाथ लोम्बर, चंद्रहास मर्गज, दत्तात्रय आरेकर, विनायक महाडिक, आणि ओरसहून खास मेळाव्यासाठी उपस्थित झालेले मिलिंद श्रीधर सावंत आदि मान्यवरांनी वैचारिक मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
मेळाव्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागातून आपले योगदान देवून सिंहाचा वाटा उचलून सहकार्य केले.